राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे, जी राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य करते. ही योजना विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
योजनेचा फायदा
- विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू शकतात.
- शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवू शकतात किंवा उद्योग सुरू करू शकतात.
- राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
- विद्यार्थी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहणार नाहीत.
- विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी आवड निर्माण होईल.
योजनाचे उद्दिष्ट
योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला सहाय्य करणे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक ताण न येता शिक्षण घेण्याची संधी मिळते.
- विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक अडचणींशिवाय शिक्षण पूर्ण करता यावे.
- परीक्षा शुल्काची 50 ते 100 टक्के प्रतिपूर्ती देणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
- शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
पात्रता
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील अटी पूर्ण कराव्या लागतात:
- अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला असावा.
- पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- नूतनीकरणासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसीलदार यांनी दिलेला)
- दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र
नूतनीकरण धोरण
- मागील वर्षी लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात.
- उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या Application ID चा उपयोग करावा.
अनुदानाची रक्कम
योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि अन्य शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम आणि संस्थेच्या प्रकारानुसार वेगवेगळी असू शकते.
अर्जाची प्रक्रिया
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील प्रक्रिया अनुसरणे आवश्यक आहे:
- ऑनलाइन अर्ज: विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.
- आवश्यक कागदपत्रे: विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पात्रता, वार्षिक उत्पन्न, निवासाचा दाखला आणि शैक्षणिक संस्थेची मान्यता यासारखी कागदपत्रे अपलोड करावी.
- अर्जाची तपासणी: संबंधित विभाग विद्यार्थी अर्जांची तपासणी करून पात्र विद्यार्थ्यांची निवड करतो.
- अनुदान वितरण: पात्र विद्यार्थ्यांना अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
सारांश
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन शिक्षण पूर्ण करू शकतात. आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती द्या जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. काही प्रश्न असल्यास आम्हाला ई-मेलवर संपर्क साधा.