नारीशक्ती दूत ॲपद्वारे लाडकी बहीणसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, पूर्ण स्टेप्स – Nari Shakti doot Application form Registration Login

नारी शक्ती दूत ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये

लेखाचे नाव: नारी शक्ती दूत ॲप
यांनी सुरू केले: महाराष्ट्र सरकार
लाभार्थी: महाराष्ट्रातील महिला रहिवासी
वस्तुनिष्ठ: महिलांना योजनेसाठी नोंदणीसाठी ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देणे
अधिकृत संकेतस्थळ: लाडली बहना योजनेसाठी हमीपात्रा

पात्रता निकष

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा
  • अर्जदार महिला असावी
  • अर्जदार 21 ते 60 वयोगटातील असावा

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वयाचा पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्नाचा पुरावा

आर्थिक लाभ

सरकार 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना या योजनेंतर्गत दरमहा 1500 रुपये देणार आहे. या योजनेचा उद्देश आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे आहे.

महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र लाडली बहना योजना जुलै 2024 पासून लागू होणार आहे.

नारी शक्ति दूत रजिस्ट्रेशन लॉगिनअर्ज प्रक्रिया

मित्रांनो, ३ जुलै २०२४ पासून नारी शक्ति दूत ॲप (Nari Shakti Doot App) प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. या अँपला लाखो डाऊनलोड्स झालेत, पण अनेकांना अर्ज करताना त्रास होतो आहे. अॅप मध्ये एरर येत आहेत आणि अनेकजण हेल्पलाइन नंबर शोधत आहेत. त्यामुळे आम्ही फॉर्म भरण्याची संपूर्ण स्टेप्स दिल्या आहेत. अर्ज प्रक्रिया मोफत आहे.

स्टेप : अॅप डाउनलोड करा

सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोरवरुन Narishakti Doot अॅप डाऊनलोड करा. इंस्टॉल करा. अॅप विषयी माहिती मिळेल.

स्टेप : मोबाईल नंबर नोंदणी

मोबाईल नंबर टाका. Terms and conditions स्वीकारा (Tick करा). लॉगिन वर क्लिक करा. मोबाईल नंबर नीट टाका. OTP येईल, तो Verify करा. प्रोफाईल पूर्ण करा.

स्टेप : नारी शक्ति रजिस्ट्रेशन प्रोसेस

महिलेचं पूर्ण नाव, ई-मेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार निवडा. अपडेट करा वर क्लिक करा. नवीन पेज ओपन होईल. नारीशक्ती दूत वर क्लिक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडा. अर्ज ओपन होईल.

व्यक्तिगत माहिती भरा. पूर्ण नाव, पती/वडिलांचे नाव, जन्म दिनांक, पत्ता, जिल्हा, तालुका, गाव, ग्रामपंचायत/महापालिका नाव, पिनकोड, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक टाका.

स्टेप : बँक खाते लिंक

शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेताय का ते निवडा. लाभाची रक्कम नमूद करा. वैवाहिक स्थिती निवडा (अविवाहित, विवाहित, विधवा, इ.). बँक खात्याचा तपशील टाका – बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का ते निवडा. लिंक नसेल तर लिंक करा.

स्टेप : कागदपत्र अपलोड करा

खालील कागदपत्रं अपलोड करा:

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र – १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी एक.
  • उत्पन्न प्रमाणपत्र – पिवळे/केशरी रेशनकार्ड नसल्यास.
  • हमीपत्र – स्वघोषणा पत्र, सही व दिनांक.
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा फोटो – कॅमेरा सुरू होईल, फोटो काढा.

Accept हमीपत्र वर क्लिक करा, माहिती जतन करा. सगळी माहिती वाचून फॉर्म सबमिट करा. मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका, फॉर्म सबमिट होईल. अर्जाची स्थिती स्क्रीनवर दिसेल, सर्वेक्षण क्रमांक मिळेल.

सूचना

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. काही वेळेस त्रास होऊ शकतो, माहिती अपलोड होण्यास विलंब लागू शकतो.

अर्ज केल्यानंतर पुढे काय?

अर्ज छाननी होईल. पात्र अर्जदारांची माहिती प्रसिद्ध होईल. राज्य आणि जिल्हास्तरावर समिती स्थापन आहे. समिती पात्र लाभार्थी ठरवेल व योजना देखरेख करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ज्यांचं अडीच लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, त्यांच्या खात्यात तत्काळ पैसे जमा होतील. अर्ज प्रक्रिया जुलैच्या शेवटी झाली, तर जुलै-ऑगस्टचे पैसे मिळतील.

नारी शक्ति ॲप एरर

अर्ज करताना एरर येऊ शकते. जास्त रिक्वेस्टमुळे असे होऊ शकते. काही वेळाने किंवा रात्री प्रयत्न करा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत